अभिलेख कक्षांचे आधुनिकीकरण व डिजिटलायजेशन (digitalization).
कार्यालयांचे आधुनिकीकरणासाठी डिजिटलायजेशन करण्यासाठी आवश्यक त्या सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा जसे संगणक, प्रिंटर, स्कॅनर इ. सुयोग्य प्रमाणात उपलब्ध असणे. त्याचप्रमाणे कार्यालयाची स्वच्छता व सुरचना यासाठी केलेल्या वैशिष्टयपूर्ण उपाययोजना.
कार्यालयातील नस्त्यांचे वर्गीकरण व निंदणीकरण
कर्मचारीपूरक असे कार्यालयीन वातावरण उदा. बैठक व्यवस्था, कार्यालयीन प्राथमिक सुविधा(जसे सुयोग्य फर्निचर, पंखे, आवश्यकतेनुसार सुस्थितीतील उद्वाहने, खेळती हवा, उजेड, पिण्यायोग्य पाणी, स्वच्छ प्रसाधनगृहे, महिलांसाठी विशेष सुविधा, उपहारगृहाची सुविधा, दिव्यांगांना आवश्यक असलेल्या सुविधा इ.)
मानव संसाधन व्यवस्थापन व कर्मचारी कल्याण, कार्यालयीन वातावरण, तणावमुक्ती, प्रेरणा, कार्यालयीन उद्दिष्टांची एकत्रित जबाबदारी व त्या दृष्टीने सांघिक प्रयत्न, कर्मचाऱ्यांची ऑनलाईन सेवापुस्तके, बायोमेट्रिक उपस्थिती, महापार(ऑनलाईन गोपनीय अहवाल), सेवार्थ इ.
अभियानापूर्व व अभियानोत्तर कार्यालयीन आरोग्य, गुणवत्ता, कार्यक्षमता यातील फरक.
सेवांची गुणवत्ता/ दर्जा यामधील वाढ.
अधिकारी/ कर्मचारी प्रशिक्षण.
निर्णय प्रक्रियेमधील टप्पे कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना, सेवा ऑनलाईन/आपले सरकार सेवा पोर्टलवर आणणे, संगणकीकरणाचा प्रभावी वापर.
शून्य प्रलंबितता व संदर्भांचा दैनंदिन निपटारा.
उपक्रमांची परिणामकारकता.
व्यवस्थापन तत्वांचा (Management Skills) प्रभावी वापर
निरनिराळे उपक्रम व त्यामुळे नागरकिांच्या सुविधेत झालेली वाढ
उपक्रमांचे सातत्य.
आय.एस.ओ. सारखे प्रमाणन व त्यानुसार प्रक्रियांमध्ये बदल करणे, त्रयस्थ संस्थेव्दारे लेखा परिक्षणाव्दारे निरंतर सुधारणा व सातत्य.
लोकाभिमुख प्रशासनाच्या दृष्टीकोनातून नागरिकांसाठी विशेष सोयी सुविधा